आज माऊलींचा संजीवन समाधी सोहळा,जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती

- आजच्याच दिवशी जवळपास सव्वा सातशे वर्षांपुर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. जन्माला येणं आणि आपलं संपुर्ण आयुष्य समाजाच्या कार्याला वाहून देणं हे संताचं फार मोठं वैशिष्ठ आहे.
आज माऊलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा. महाराष्ट्रातल्या खेडो-पाड्यातून,गावागावातून लाखो वारकरी,हजारो दिंड्या विविध आज इंद्रायणी काठावर येऊन विसावलेत.पंढरपूराहून विठुरायाचीही पालखी माऊलींच्या भेटीसाठी आळंदीत दाखल झालेय.संपुर्ण आळंदी नगर ग्यानबा-तुकारामच्या गजाराने निनादून गेलेय.
खरंतर आजच्याच दिवशी जवळपास सव्वा सातशे वर्षांपुर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. जन्माला येणं आणि आपलं संपुर्ण आयुष्य समाजाच्या कार्याला वाहून देणं हे संताचं फार मोठं वैशिष्ठ आहे. हजारोंच्या संख्येने जगाभरात लहान बाळं जन्माला येतात. हजारोंच्या संख्येने जगातली माणसं हे जग कायमचं सोडून निघून जातात.
यातल्या ९९ टक्के लोकांना आपल्याला देवाने मनुष्य म्हणूनच का जन्माला घातलं याचं उत्तर ठाऊक नसतं. म्हणूनच अनेक जण गर्दीत जन्माला येतात आणि हिच गर्दी पाठीशी घेऊन स्वर्गलोकी जातात.
मात्र, संतांना आपण कश्यासाठी जन्म घेतलाय? देवाने आपल्याला कशासाठी या भूलोकामध्ये पाठवलं आहे? आपण कुठे थांबणं गरजेचे आहे? या प्रश्नांची उत्तरं सहज मिळतात.
याचं उत्तर माऊली ज्ञानश्वेरांनाही सहज सापडलं. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी भावार्थदिपीका हा ग्रंथ लिहून त्यांनी भगवत गीतेचं सारं सांगितलं. मराठी भाषेला समृद्ध केलं आणि जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. लोकांना जगण्याचं बळ देतील अश्या ओवी रचल्या आणि आपल्या भावांडांचा सांभाळ करत विठ्ठलभक्तीचा मार्ग ज्ञानश्वेरांनी महाराष्ट्राला दाखवला.
यानंतर माऊलींनी इहलोकीचा कार्य संपवलं आणि संजीवन समाधीचा निर्णय घेतला.मुखी विठुरायाचं नामस्मरण करत ज्ञानश्वेरांनी आळंदीमध्ये इंद्रायणी काठी आपली समाधी लावली आणि त्यांनी आपली इहलोकीची यात्रा थांबवली.
दरम्यान माऊली आजही आपल्यात आहेत हि भावना ठेवून लाखो वारकरी आळंदीला पायी येतात आणि माऊलींच्या नामस्मरणात दंग होऊन जातात.