लढताना रंक्तबंबाळ झालेला माझा देह इंग्रजांच्या हाती लागण्या आधी जाळून टाका,असं म्हणत झाशीच्या राणीने अखेरचा श्वास घेतला….

- झाशी हातून जाऊ द्यायची नाही या निर्धाराने राणी लक्ष्मीबाईंनी १८५८ च्या लढाईत जवळजवळ दोन आठवडे वेढा घालून इंग्रजांशी कडवी झुंज दिली. या दरम्यान झाशीची रयत लक्ष्मीबाईंकडे राणीच्या दृष्टीकोनातून पाहत होती. राणी लक्ष्मीबाई दोन्ही हातात तलवारी घेऊन, धाकटा मुलगा दामोदरला पाठीवर बांधून रणांगणात लढत होती.
मातृभूमीच्या रक्षणासाठी स्त्रीयाही पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या हा आपल्या देशाचा इतिहास आहे. याच इतिहासाला नवसंजीवनी मिळाली ती झाशीच्या राणीमुळे.
मणिकर्णिका हिचा विवाह झाशीचे राजे गंगाधर नेवाळकर यांच्याशी झाला. या विवाहानंतर मणिकर्णिका हिचं नामकरण लक्ष्मीबाई असं करण्यात आलं. या लक्ष्मीबाईंना लग्नानंतर पुत्रप्राप्ती झाली पण हा पुत्र अवघ्या काहीच महिन्यात दगावला.
यानंतर त्यांनी पुत्र दत्तक घेतला. मात्र, त्याला उत्तराधिकारी करायला इंग्रजांनी मान्यता दिली नाही. दरम्यानच्या काळात झाशीचे राजे गंगाधर नेवाळकर याचं निधन झालं. नेवाळकरांच्या निधनानंतर तत्कालीन ब्रिटीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने थेट झाशीचा किल्ला ताब्यात घेण्याचे आदेश आपल्या सैन्याला दिले आणि इथूनच लक्ष्मीबाईंचा झाशीची राणी होण्याचा प्रवास सुरू झाला.
गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने झाशीचा किल्ला ताब्यात घेण्याचा सैन्याला दिलेला आदेश लक्ष्मीबाईंच्या जिव्हारी लागला. या आदेशाविरोधात उठाव करण्याचा दृढ निश्चय लक्ष्मीबाईंनी केला आणि ‘मी माझी झाशी देणार नाही’ म्हणत इंग्रजांविरोधात लक्ष्मीबाईंनी सशस्त्र लढा उभारला.
झाशी हातून जाऊ द्यायची नाही या निर्धाराने राणी लक्ष्मीबाईंनी १८५८ च्या लढाईत जवळजवळ दोन आठवडे वेढा
घालून इंग्रजांशी कडवी झुंज दिली. या दरम्यान झाशीची रयत लक्ष्मीबाईंकडे राणीच्या दृष्टीकोनातून पाहत होती. राणी लक्ष्मीबाई दोन्ही हातात तलवारी घेऊन, धाकटा मुलगा दामोदरला पाठीवर बांधून रणांगणात लढत होती.
राणीनेही हार मानली नाही. राणीच्या अंगावर तलवारीचे, बंदुकीच्या गोळ्यांचे असंख्य वार झाले होते. डोकं फुटलं होतं, एक डोळा लोम्बकळत बाहेर आला होता. राणी चक्कर येऊन धारातीर्थी पडणार, पण इतक्यात तिने एक इंग्रज मारून एका मंदिराच्या दिशेने घोडा वळवला.
राणी लक्ष्मीबाई यांच्या पाठोपाठ त्यांचा एक सैनिकही आला. ब्रिटिशांनी तिच्या शरीराला हात लावू नये, अशी त्यांची इच्छा होती. ‘माझ्या देहाला इंग्रजांचा स्पर्श होता कामा नये. त्याआधी माझा देह जाळून टाका आणि माझ्या दामोदरला सांभाळा!’ अशी आज्ञा देत त्यांनी आपला देह ठेवला.
शेवटच्या श्वासापर्यंत राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या मातृभूमीसाठी शत्रूशी कडवी झुंज दिली आणि त्या इतिहासाच्या पानावर आजरामर झाल्या.