या व्यक्तीमुळे राखी सावंतने मराठी बिग बॉसमध्ये येणं पसंत केलं

हिंदी बिग बॉसने तयार केलेली देशातील हटके वाईब लक्षात घेता बिग बॉस हा रियालिटी शो देशातील कोणत्याही प्रादेशिक भाषेत सुरू झाला तरी लोकं तितक्याचं आवडीनं हा कार्यक्रम बघणार यात काही शंका नाही. अश्यात मराठीत भाषेतही कलर्सने करून पाहिलेल्या या प्रयोगाला प्रचंड मोठं यश मिळालं आणि बघता-बघता यशस्वीपणे या शोचे ३ सिझन मोठ्या उत्साहात पार पडले. आणि आता चौथा सिझनही शेवटच्या टप्प्यात आहे.

मात्र,बिग बॉस मराठीचा हा सिझन बिग बॉसच्या चाहत्यांसाठी खास आहे. कारण, हिंदी सिनेसृष्टीत आपल्या हटके अंदाजाने चर्चेत असलेली अभिनेत्री राखी सावंत हिने मराठी बिग बॉसमध्ये केलेली एन्ट्री. समोर येणारे असंख्य टास्क, आपला करारी बाणा, सोबतच्या स्पर्धकांमध्ये स्वत:ची तयार होणारी इमेज, टिव्हीवर पाहणारे या शोचे असंख्य चाहते या सर्व टप्प्यांमधून यशस्वीपणे जात अभिनेत्री राखी सावंतने हा सिझन प्रेक्षकांच्या लक्षात राहिल इतका गाजवलाय आणि म्हणूनच राखी सावंत ही शेवटच्या सहा स्पर्धकांमध्ये टिकून आहे.

दरम्यान याच आठवड्यात शेवटच्या ६ स्पर्धकांमधून एक स्पर्धेक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे.याचसोबत उर्वरित पाच स्पर्धकांमध्ये या सिझनचा महाविजेता होण्यासाठी कडवी झुंज लागणार आहे.मात्र,अश्यात नुकत्यात टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये राखी सावंतचा इमोशनल अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला.

यावेळी बिग बॉस मराठी सिझन ४ च्या घरात आतिषबाजीसह बिग बॉसकडून ६ स्पर्धकांना सरप्राईज देण्यात आलं. या सरप्राईजमध्ये घरातील स्पर्धकांचा आतापर्यंतचा प्रवास त्यांना दाखवण्यात आला. यात सर्वात आधी राखी सावंत हिचा या घरातील प्रवास दाखवण्यात आला. हा प्रवास पाहताना राखीच्या डोळ्यांत पाणी आलं. या व्हिडीओत राखी सावंतच्या घरातील एन्ट्रीपासून ते तिने केलेल्या धमाल मज्जा-मस्तीपर्यंतचे सगळे किस्से हे या एका व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आले. यावेळी राखी सावंत हिला आपल्या आई वडिलांची आठवण आली.

राखी सावंत

राखीने मराठी बिग बॉसमध्ये यावं अशी तिची वडिलांची इच्छा होती.ती इच्छा बीग बॉसमुळे पुर्ण झाल्याचं यावेळी तीने बोलून दाखवलं.तसंच मी बिग बॉसमध्ये आल्यानं मी बाबांचं स्वप्न पुर्ण करू शकले त्यामुळे आता बाबांच्या आत्म्याला शांती लाभेल,अशी भावनाही तीने यावेळी बोलून दाखवली.तसंच राखीने, ‘मी आतापर्यंत हिंदी सिनेविश्वात खूप काम केलं पण, मी मराठी असून देखील मला मराठीत आणि माझ्या महाराष्ट्रात काही काम करण्याची संधी मिळाली नाही. मला नेहमीच मराठीत आणि महाराष्ट्रात काम करायचे होते. बिग बॉसने मला ही संधी दिली. आज मला या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रचं प्रेम मिळालं आहे’,असं मत देखील तीने व्यक्त केलं.

दरम्यान येत्या रविवारी या सिझनचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे.यावेळी या सिझनचा खरा महाविजेता कोण ठरणार हे संपुर्ण महाराष्ट्राला कळणार आहे.या महाअंतिम सोहळ्याची महाराष्ट्रातील चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page