महाराष्ट्रभर ‘वेड’चीच चर्चा,वाचा बजेट,कमाई आणि अन्य बाबी

- सध्या वेडला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असून मराठी सिनेसृष्टीच्या नवीन वर्षाची सुरूवात वेड सिनेमाने दमदार केली आहे.'वेड'ला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता रितेश-जिनिलीयावर कौतुकाचा वर्षाव मराठी सिनेसृष्टीतून केला जातोय.
सध्या महाराष्ट्रात वेड या सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे.कारण,या सिनेमामध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या जोडीनं मराठीत पहिल्यांदा एकत्र येत प्रेमाची मोहिनी प्रेक्षकांवर फिरवलेय. हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास दोन आठवडे उलटून गेलेत. मात्र, अद्यापही या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळतोय. या सिनेमाने गेल्या दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली आहे. याच सिनेमाविषयीच्या काही रंजक गोष्टी आज आपण या लेखातून जाणार घेणार आहोत.
अभिनेता रितेश देखमुखने साधारणत: एका वर्षापूर्वी या सिनेमाची घोषणा केली होती. हा सिनेमा रितेशचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.कारण,या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयसृष्टी गाजवणारा रितेश ‘दिग्दर्शक’ म्हणून प्रेक्षकांच्या समोर आलाय. खरंतर आता ‘वेड’ला मिळत असलेला प्रतिसादाकडे पाहून रितेशचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय जिनिलीयाचाही हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. मात्र, तरीही तिने स्वतःला सिद्ध करत या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
रितेश आणि जेनेलियाने या आधी बॉलीवूडमध्ये एकत्र काम केलं आहे.मात्र मराठी सिनेमात या जोडीनं पहिल्यांदाच एकत्र येत आपला रोमॉंटिक अंदाज प्रेक्षकांना दाखवला आहे.हा सिनेमा तयार करण्यासाठी जवळपास रितेशला १५ कोटी रुपयांचा खर्च आला.म्हणजे या सिनेमाचं बजेट हे जवळपास १५ कोटींच्या आसपास आहे.
दरम्यान,या सिनेमाच्या बजेटनुसार जर आपण या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहायला गेलो तर हा सिनेमा सध्या या सिनेमाच्या निर्मितीचं गणित फायद्यात असल्याचं पाहायला मिळतंय.या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात तब्बल २०.६७ कोटींचा गल्ला जमवला.तर दुसऱ्या आठवडयात यशस्वी घौडदौड करत सिनेमाने एकूण ३५ कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय.
सध्या वेडला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असून मराठी सिनेसृष्टीच्या नवीन वर्षाची सुरूवात वेड सिनेमाने दमदार केली आहे.’वेड‘ला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता रितेश-जिनिलीयावर कौतुकाचा वर्षाव मराठी सिनेसृष्टीतून केला जातोय.