अशक्य वाटणारी ही गोष्ट छत्रपती शिवरायांनी आपल्या दूरदृष्टीने सहज करून दाखवली..

थोडक्यात
  • आपण महाराजांच्या नौदलाविषयी जाणून घेण्याअगोदर भारतातील वैदिक काळातील नौदल सेनेचा इतिहास जाणून घेवू. हा इतिहास जवळपास आठ हजार वर्ष जुना आहे.याचा उल्लेख वेदांमध्ये सुद्धा आढळून येतो हे विशेष आहे.हडप्पासंस्कृतीत देखील नौदलाचा वापर केला जात असल्याचा दाखला उपलब्ध आहे.ऋग्वेदामध्ये सुद्धा भगवान वरूण यांच्या रूपाने नौसेनेच्या विषयींचा मुद्दा सापडतो. भगवान वरूण हे समुद्र जल तसंच नद्यांचे देवता म्हणून संबोधले जातात.

‘हू इस फादर ऑफ इंडियन नेव्ही’ असं गुगलला नुसतं टाकलं तरी एक नाव लगेच डोळ्यासमोर दिसतं ते म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज’.याच शिवरायांनी कोणताही अनुभव पाठीशी नसताना,कोणतंही प्रशिक्षण नसताना, निव्वळ दूरदृष्टी महत्त्वकांक्षेच्या बळावर भारतीय सागरी सीमांना आरमारांच्या माध्यमातून लढायला शिकवलं. आजची गोष्ट ही छत्रपती शिवरायांच्या याच नौदलसेनेच्या दूरदृष्टी विचारशक्तीची आहे.

दरवर्षी ४ डिसेंबरला देशभरात नौदल सेना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.याच दिवशी भारतीय नौदल सेना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ‘ऑपरेशन ट्रायडंट’च्या विजयाचा आनंद साजरा करते.

पाकिस्तानच्या छुप्प्या हरकतींना जश्यास तसं उत्तरं देत भारताच्या वीर नौदल सेनेनं १९७१ रोजी पाकिस्तानच्या कराची बंदरावर आपल्या लढाऊ युद्धनौकांच्या माध्यमातून क्षेपणास्त्र डागत कराची बंदर बेचिराख केलं होतं.विशेष म्हणजे भारताची यामध्ये कसलीच हानी झाली नाही.दरम्यान या घटनेमुळे पाकिस्तानने भारताचा चांगलाच धसका घेतला.याच घटनेच्या स्मरणार्थ ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल सेना मोठ्या उत्साहात साजरा करते.


आपण महाराजांच्या नौदलाविषयी जाणून घेण्याअगोदर भारतातील वैदिक काळातील नौदल सेनेचा इतिहास जाणून घेवू. हा इतिहास जवळपास आठ हजार वर्ष जुना आहे.याचा उल्लेख वेदांमध्ये सुद्धा आढळून येतो हे विशेष आहे.हडप्पासंस्कृतीत देखील नौदलाचा वापर केला जात असल्याचा दाखला उपलब्ध आहे.ऋग्वेदामध्ये सुद्धा भगवान वरूण यांच्या रूपाने नौसेनेच्या विषयींचा मुद्दा सापडतो. भगवान वरूण हे समुद्र जल तसंच नद्यांचे देवता म्हणून संबोधले जातात.

भारतीय नौदलाच्या वेबसाईटनुसार, आदिकाळामध्ये जहाजांच्या माध्यमातून वापरण्यात आलेल्या सागरी मार्गाचे ज्ञानसुद्धा वेदांमध्ये दिलेले आहे. याचसोबत अर्थववेदामध्ये सुद्धा विशाल जहाजांचा उल्लेख आढळून येतो. मात्र,असं जरी असलं तरी ही नौदलाची गोष्ट मध्ययुगात भारतीयांसाठी अज्ञात होती. अश्यात ही गोष्ट अस्तित्वात येण्यामागं शिवरायांची दूरदृष्टी कारणीभूत ठरली.

मध्ययुगीन कालखंडात हिंदूस्थानावर अनेक परकिय आक्रमणं होत होती.अनेक व्यापारी आपल्या मोठं-मोठ्या जहाजा घेऊन भारतात व्यापारासाठी येत होते आणि इथे आपले हातपाय पसरून राज्यकर्ते बनत होते.छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीने ही गोष्ट हेरली आणि त्यांनी परकिय व्यापारी तसंच शत्रूंना वेसन घालण्यासाठी नौदलाची निर्मिती करण्याची संकल्पना सत्यात उतरवली.

ही नौसेना सत्यात उतरवण्यासाठी स्वराजातील कुशल कामगारांना सोबत घेऊन महाराजांनी अभ्यास केला आणि या अभ्यासातून कोकणकिनारपट्टीवर लढाऊ आरमारांची निर्माती केली. बघता-बघता ही आरमारं उभी राहिली. पण आता या आरमारांना सुरक्षित ठेवण्यासाठी जहाजांची आवश्यकता स्वराजाला भासत होती. या आधी स्वराजाला डच, फ्रेंच, इंग्रज यांच्यावर अंवलंबून राहून जहाजा उपलब्ध कराव्या लागायच्या. मात्र, त्या जहाजा फार काळ टिकाव धरून राहत नसतं. महाराजांना हे लक्षात आल्यानंतर महाराजांनी कुणावरही अवलंबून न राहता स्वबळावर जहाज निर्मितीचं धाडस केलं आणि कल्याण बंदरावर जहाजनिर्मितीचं केंद्र उभारलं. त्याचं केंद्रावर जहाज निर्मिती सुरू केली आणि बघता-बघता स्वनिर्मित लढाऊ,तसंच बलाढ्य जहाजं या केंद्रात बनू लागली.

ही जहाजं महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणार्थ समुद्रात उतरवली आणि समुद्र मार्गांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र नौसेनेची स्थापना केली.या नौसेनेचे प्रमुख होते सुभेदार कान्होजी आंग्रे.यावेळी जवळपास पाच हजार मावळे आणि ६० हून अधिक लढाऊ युद्ध नौका स्वराजाकडे होत्या. याचं बळावर महाराजांनी आपलं स्वराज शत्रूच्या ताबडीतून सुरक्षित ठेवलं.

या आरमारांमुळेच अनेक परकिय शत्रूंवर महाराजांनी जरब बसवली आणि ही जरब बसवताना यात कान्होजी आंग्रेंसह दर्यासारंग दौलतखान या मराठा सैन्यातील मुस्लिम मावळ्यानं महत्त्वाची भूमिका बजावली.महाराजांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली अशी ही स्वराजातील नौसेना आजच्या स्वातंत्र भारतातीय नौदलासाठी प्रेरणा ठरली आहे.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page