हिंदू अल्पसंख्याक होत चाललाय?

- भारतात बहुसंख्य असलेला हिंदू समाज संघटित नसल्याने आज आपल्याच देशात त्याला शांत राहावे लागत आहे.तर दुसरीकडे अल्पसंख्याक असलेला मुस्लिम समाज कट्टरतावादी भावनेने एक संघ राहून आपली एकी दाखवत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार आपल्या देशात 79% लोकसंख्या हिंदू आहे.मात्र,तरीही हिंदू भारतात खाली मान घालून राहत आहे.
कर्कटकाचं एक टोक भारतभूच्या मध्यभागी ठेवलं आणि संपूर्ण कर्कटक वाकवून जर एखाद्याने भारतभूच्या नकाशावर गोलाकार वर्तुळ रेखाटला तर त्या वर्तुळाबाहेर आपला भारत देश जात होता. येवढा मोठा आपल्या देशाचा नकाशा होता आणि या देशात हिंदू समाज गुण्यागोविंदाने नांदत होता. सप्तनद्या,सप्तपर्वत रांगा यांनी परिपुर्ण असलेला आपला देश जगाला लाभदायी खाद्यपदार्थ, निरोगी आरोग्याची सुत्रं, संस्कृती अभ्यास, आयुर्वेद अश्या एक ना अनेक गोष्टी बहाल करत होता.
उदारतामतवादी विचारांनी व्यापारासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला आश्रय देत होता. मात्र, इथेच घात झाला. व्यापारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना हिंदूंनी आश्रय दिला आणि त्यांनी देशभर आपले हात पाय पसरायला सुरूवात केली.
देशातील मसाल्याचे पदार्थ,साहित्य निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती याचा आपल्या देशात असलेला पुरेसा साठा लक्षात घेवून या व्यापाऱ्यांनी इथे आपले बस्तान बसवले आणि आपले हात पाय पसरायला सुरूवात केली.
काही वेळ व्यापार केल्यानंतर त्यांनी इथल्या राजकारणात शिरकाव केला.राजकारणात शिरकाव होताच आपल्या देशात त्यांनी त्यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार केला.फोडा आणि राज्य कराची निती अवलंबून जबरदस्तीने अनेक स्थायी हिंदूंना धर्मांतरित केलं आणि मग राज सिंहासन मिळवण्यासाठी एक-एक प्रांत काबिज करून त्यावर आपला हुकूम हे व्यापारकर्ते चालवू लागले.
सुरूवातीला मुस्लिम आक्रमणे,मग ख्रिस्ती,मग पोर्तुगीज, डच, इंग्रज अश्या अनेक परदेशी आक्रमकांनी व्यापाराच्या नावाने आपली मुळं भारतात पसरली आणि ते इथे राज्य करू लागले.यातून पुढे मग हा देश विविध तुकड्यात विखुरला गेला.आधी अफगानिस्तान,मग पाकिस्तान,मग बांग्लादेश असे तीन देश भारतभूचे तुकडे करून तयार झाले. दरम्यान तयार झालेले हे तीनही देश आज मुस्लिम राष्ट्र आहेत.
दुसरीकडे भारतभू परकिय आक्रमकांच्या तावडीतून सुटून १९४७ ला स्वातंत्र झाली. मात्र,भारताने सार्वभौमाची भूमिका घेतल्याने हिंदू राष्ट्राचा जाहीर पुरस्कार केला नाही.इथली बहुसंख्य जनता हिंदू असुनही भारताने हिंदू राष्ट्राची भूमिका जाहीरपणे बोलून दाखवली नाही.
२०११ च्या जनगणनेनुसार आपल्या देशात 79% लोकसंख्या हिंदू आहे.मात्र,तरीही हिंदू भारतात खाली मान घालून राहत आहे.दुसरीकडे भारतात फक्त 14% मुस्लिम समाज आहे.मात्र, असं असतानाही या देशातील हिंदूंची आस्था जपणाऱ्या वास्तू आजही मुस्लिम समाजाकडेच आहेत.जसं की,काशीतील ज्ञानव्यापी,मथुरेतील मंदिर जे आक्रमकांनी मश्जिदीत रूपांतरित केले आहे.याविषयावर अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील व देशातील वातावरण गढुळ होईल म्हणून बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात यावर जास्त बोललेही जात नाही.
दुसरीकडे हिंदू सण-उत्सवांवर निर्बंध लादले जातात.रात्री दहानंतर स्पीकरवर बंधनं येतात.मात्र, हिंदू बहुसंख्य असलेल्या आपल्या देशात पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होणाऱ्या भोंग्यावरील अजान निर्विघ्नपणे सुरूच राहतात.येवढंच नाही तर या अजान दिवसातून पाच पाच वेळा भोंग्यावरच होतात.असं असतानाही भीतीपोटी या भोंग्यावर कारवाई होताना दिसत नाही.
भारतात एकीकडे अनाधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या मश्जिदी मोठ्या दिमाखात उभ्या राहतात.मात्र,मंदिरं सर्रास पाडली जातात.तुम्ही जर कोल्हापूरच्या विशाळगडावर गेला असाल तर तुम्हाला अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजाने केलेले अतिक्रमण दिसेल.या अतिक्रमणाला पाडण्यासाठी सरकारं धास्तावतात.पण हिंदूंची धार्मिक स्थळ अनाधिकृत पट्ट्यात आली कि कोणतीही तमा न बाळगता जमीनदोस्त केली जातात.
भारतात हिंदू धर्मामधील अनिष्ठ रूढी परंपरांवर बंदी आणावी यासाठी मोठे प्रयत्न होताना दिसतात.याला हिंदू धर्मातील सर्वच जण समर्थनही देतात.मात्र,लव्ह जिहाद,हलाल,वाढीव कुटुंब पद्धती या प्रकारावर आपल्या देशातली सरकारं मुग गिळून गप्प बसतात.
भारतात बहुसंख्य असलेला हिंदू समाज संघटित नसल्याने आज आपल्याच देशात त्याला शांत राहावे लागत आहे.तर दुसरीकडे अल्पसंख्याक असलेला मुस्लिम समाज कट्टरतावादी भावनेने एक संघ राहून आपली एकी दाखवत आहे.
खरंतर 14% मुस्लिम समाज भारतात मोठ्या गुण्यागोविंदाने राहतो.मात्र,हीच टक्केवारी हळूहळू वाढू लागली आहे.असं जर होत राहिलं तर एकेकाळी अखंड भारतात बहुसंख्य असलेले हिंदू आता अल्पसंख्यांक आहेत असं म्हणायची वेळ येईल.