इथं गंडला आप,वाचा गुजरातमधील आपच्या पराभवाची कारणं..

थोडक्यात
  • ज्या आत्मविश्वासाने आप पक्षाने गुजरातमध्ये सत्ता स्थापन करण्यासंदर्भातील दावा मतदारांना केला होता,तो दावा गुजरात निवडणुकच्या निकालानंतर फेल गेल्याचं स्पष्ट दिसत आहे. दरम्यान गुजरात निवडणूकीत आप नेमका गंडला कुठे? याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत.

गुजरात राज्याच्या निवडणूकिचा निकाल स्पष्ट होऊ लागला आहे.हळूहळू महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर येत आहे.या आकडेवारीनुसार बहुमताने भाजपाने बाजी मारत गुजरातच्या सत्तास्थापनेचा आपला मार्ग निश्चित केला आहे.तर कॉंग्रेसने भाजपनंतर सर्वाधिक मत मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आपली मोहोर उमटवली आहे.

दरम्यान हा स्पष्ट होत असलेला निकाल अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षासाठी धक्कादायक ठरला आहे.कारण,ज्या आत्मविश्वासाने आप पक्षाने गुजरातमध्ये सत्ता स्थापन करण्यासंदर्भातील दावा मतदारांना केला होता,तो दावा या निकालानंतर फेल गेल्याचं स्पष्ट दिसत आहे. दरम्यान गुजरात निवडणूकीत आप नेमका गंडला कुठे? आपने काय काय चुका केल्या? आप नेमका कुठे कमी पडला? याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत.

आम आदमी पार्टीने दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आपला मोर्चा गुजरातकडे वळवला होता.गुजरात निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आपने गुजरातमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी तीन प्रमुख मुद्दे निवडले होते.यातला पहिला मुद्दा म्हणजे ‘दिल्ली मॉडेल’.

दिल्ली मॉडेल – अरविंद केजरीवाल यांनी गुजराती मतदारांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी दिल्लीप्रमाणे फ्रि वीज,फ्रि पाणी,आणि फि शिक्षणाचं आश्वासन दिलं.मात्र देशभर गुजरात मॉडेल आदर्शवत मानणाऱ्या गुजराती जनतेने आपचं दिल्ली मॉडेल सपशेल नाकारलं.त्यामुळे दिल्ली मॉडेलची जादू गुजरातमध्ये दिसली नाही.

नोटांवर लक्ष्मी-गणपती – हिंदूना आकर्षित करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे नोटांवर लक्ष्मी आणि गणपतींची प्रतिमा छापली जावी,अशी शिफारस केली. मात्र,नोटांवर देवांचे फोटो छापल्याने त्यांना अनावश्यक ठिकाणी वापरले जाईल व त्यामुळे देवांचा अवमान होईल अश्या प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागल्यानंतर आपचा हा मुद्दा ही फेल गेला.

जुनी पेंशन योजना
पंजाबच्या धर्तीवर गुजरातमध्येही जुनी पेंशन योजना लागू करण्याचं आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेला दिलं होतं.या योजनेचा आपने जोरदार प्रचार देखील केला होता.मात्र,ही योजना गुजराती जनतेच्या पचनी न पडल्यानं हा ही मुद्दा फेल गेला.

आपने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती.मात्र,आपची जादू गुजरातमध्ये न दिसल्यानं आपला गुजरातमध्ये समाधानकारक कामगिरी करता आली नाही.दरम्यान गुजरातमध्ये पाच जागांवर विजय संपादित करत आपने गुजरातमध्ये आपलं खातं उघडलं आहे.यामुळेच ‘आप’ला आता राष्ट्रीय पक्ष होण्याचा मान मिळाला आहे.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page