….म्हणून तरूणाईमध्ये गौतमी पाटीलची क्रेझ आहे

- काही आठवड्यांपूर्वी तर गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात एक खळबळजनक प्रकार घडला. सांगली जिल्ह्यातल्या एका गावात जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरूणांच्या गर्दीने अक्षरश: कहर केला.
हेडिंग बघून लेख वाचण्यासाठी आलेल्या तमाम वाचकांना आज सोशल मिडीयावर धुमाकूळ घालणाऱ्या गौतमी पाटील विषयी आम्ही थोडीशी माहिती देणार आहोत. कोण आहे गौतमी पाटील?, बातम्यांमध्ये, सोशल मिडीयावर, रिल्सवर, व्हॉट्सऍपच्या स्टेटसवर दिसणाऱ्या गौतमीची तरूणांमध्ये एवढी क्रेझ का आहे? यासोबत तुम्हाला पडलेल्या गौतमीबद्दलच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं या लेखातून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तरं झालं असं, पुण्यामध्ये दंहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह वाढावा, यासाठी लाईव्ह ऑर्केस्ट्रा तसंच लावण्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह शिगेला पोहचला होता. अश्यात लावणी सादर करता-करता अश्लील हावभाव करत एक तरूणी व्यासपीठावर नाचत होती. तीचे हावभाव अनेक मोबाईलच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होत होते. बघता-बघता हे व्हिडीओ एका रात्रीत असे काय व्हायरल झाले कि त्यातून या तरूणीवर टिकेची झोड उठू लागली. हि तरूणी म्हणजेच गौतमी पाटील.
व्हायरल व्हिडीओमुळे सर्वच स्तरातून टिका होऊ लागल्यानं तसंच चूक लक्षात आल्यामुळे आपल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून गौतमीने सर्वांची माफी मागितली आणि इथूनच ती प्रकाशझोतात आली. मग काय? गौतमीचा कार्यक्रम हाय म्हटल्यावर, गल्ली-बोळात कट्ट्या-बिट्टयावर बसणारी पोरं,आई-बापाकडून पेट्रोलचे पैसे घेऊन १०० किलो मीटर लांब जाऊन कार्यक्रमाला गर्दी करू लागली. येवढंच नाही तर व्हिडीओ शूट करून आपल्या सोशल मिडीयावर टाकायला लागली. दुसरीकडे या गर्दीने पोलीसांची डोकेदुखी चांगलीच वाढवली.
काही आठवड्यांपूर्वी तर गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात एक खळबळजनक प्रकार घडला. सांगली जिल्ह्यातल्या एका गावात जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरूणांच्या गर्दीने अक्षरश: कहर केला. यावेळी शाळेच्या पत्र्यावर चढून तरूणाई नाचत असल्याचा प्रकार समोर आला.यामुळे शाळेचे फार मोठे नुकसान झाल्याचं देखील समजलं. यातच एकाचा मृत्यू देखील झाल्याचं वृत्त काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलं आहे.या प्रकाराबद्दल गौतमीला विचारलं असता गौतमीने दिलगीरी देखील व्यक्त केली आहे.
कोण आहे गौतमी पाटील ?
गौतमी पाटील ही मुळची धुळे जिल्हयातील सिंधखेडा गावची. तिचं संपूर्ण बालपण इथेच गेलं. गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडीलांनी तिची आणि तिच्या आईची साथ सोडली. तेव्हापासून या दोघीही आईच्या वडिलांकडे राहायला लागल्या. सिंधखेडामध्येच गौतमीने आपले आठवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आणि यानंतर गौतमी आणि तिची आई पुण्याला राहायला आल्या.
घरच्या परिस्थितीमुळे गौतमीने शिक्षण सोडलं
आठवीला असताना गौतमीने वडिलांना पहिल्यांदा पाहिले.पुण्यात स्थिरावल्यानंतर गौतमीने वडीलांना परत घरी आणण्याचा प्रयत्न केला. पण वडिलांचे दारूचे व्यसन, आईला मारहाण करणे सुरूच राहिल्याने तिने पुन्हा वडिलांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात तिच्या आईचा अपघात झाला आणि घरची जबाबदारी गौतमीवर आली. याचवेळी ती नृत्याकडे वळाली.
सुरूवातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणारी गौतमी कधी बॅकडान्सर म्हणूनही काम करायची.यानंतर ती हळूहळू लीडडान्सर प्रेक्षकांसमोर येऊ लागली. तिने महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये आपले लावण्यांचे कार्यक्रम केले आहेत. दरम्यानच्या काळात तिच्यावर झालेल्या टिकेने धास्तावलेली गौतमी यापूढे अश्लील हावभाव करणार नाही म्हणून माध्यमांसमोर नम्रतेने बोलत होती.यानंतर हा बद्दल तिने आपल्यात केला आणि आज ती महाराष्ट्राची लावणी परंपरा उत्तमरित्या जोपासतेय. नुकतंच तिला एक अल्बम सॉंग देखील मिळालं आहे. याला युट्युबवर नेटकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय.
महत्त्वाचं काय? गौतमी पाटील हिला सध्या योग्य ट्रॅकवर येण्यासाठी संधी मिळालेय.तिने या संधीचं सोनं करावं आणि महाराष्ट्राची परंपरा निष्ठेने जापावी. तसंच गौतमीसाठी वेळ घालवणाऱ्या तरूणांनी आपल्या करिअरवर कॉन्सेन्ट्रेट करावं आणि आपलं आयुष्य योग्य ट्रॅकवर आणावं,हिच आशा..