मुंबई महानगरपालिकेची इमारत महात्मा फुलेंच्या कंपनीने उभारलेय,वाचा फुलेंच्या कंपनीची गोष्ट

थोडक्यात
  • महात्मा फुलेंनी समाजाच्या हितासाठी आपल्या कंपनीकडे पाठ फिरवली.या कंपनीची वार्षिक उलाढाल ही जवळपास वीस हजार रूपये इतकी होती.या लेखातून आपण याच कंपनीची माहिती घेणार आहोत.

काही जणं आपलं सोप आणि सोईस्कर आयुष्य समाजासाठी उगीच किचकट करून जगत असतात.यामागे त्यांना त्यांच्या जगण्याचा उदेश उमगलेला असतो.आपण जन्माला कशाला आलोय याचं उत्तर त्यांना मिळालेलं असतं आणि म्हणून ते आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवून त्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात.मग एक तर ते संत म्हणून नावारूपाला येतात किंवा महापुरूष बनून अनेकांच्या आदर्शस्थानी बसतात.आजची गोष्ट अश्याच एका महापुरूषाची आहे.

महात्मा फुले हे नाव महाराष्ट्राला गेल्या शंभरहून अधिक वर्षापासून परिचयाचं आहे.कारण,त्यांनी महाराष्ट्राच्या घराघरात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्याचं फार मोठं कार्य केलंय.येवढंच नाही तर स्त्री शिक्षणासाठी प्रसंगी दगड-धोंडे देखील झेललेले आहेत.पण तुम्हाला माहितेय का? महात्मा फुले हे येवढे श्रीमंत होते कि मनात आणलं असतं तर एखादं फाईव्ह स्टार हॉटेल सहज खरेदी केलं असतं.

पण फुलेंनी तसं केलं नाही,फुलेंना आपल्या जगण्याचा मार्ग सापडला होता.स्वत: उच्च शिक्षित असलेल्या महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीमाईंना शिक्षणाचे धडे गिरवायला भाग पाडले आणि यानंतर तत्कालिन समाजातील प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्त्रीयांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलं.तसंच शिक्षणाची चळवळ उभी केली.

महात्मा फुलेंनी समाजाच्या हितासाठी आपल्या कंपनीकडे पाठ फिरवली.या कंपनीची वार्षिक उलाढाल ही जवळपास वीस हजार रूपये इतकी होती.या लेखातून आपण याच कंपनीची माहिती घेणार आहोत.’पुना कमर्शियल इन कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी’ असं महात्मा फुले यांच्या कंपनीचं नाव होतं.या कंपनीचे महात्मा फुले कार्यकारी संचालक होते.तत्कालिन यशस्वी उदयोगपतींच्या यादीत त्यांची गणना केली जात होती.

महात्मा फुले यांची हि कंपनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित होती.आज आपल्याला मुंबईत आल्यानंतर सीएसएमटी स्थानकाबाहेर मुंबई महानगरपालिकेची जी इमारत दिसते ती इमारत महात्मा फुले यांच्या याच कंपनीने उभारलेली आहे.येवढंच नाही तर मुंबईतल्या अनेक कापडगिरण्या,परळचं रेल्वे वर्कशॉप,भंडारदरा जलाशय,बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीनिवास राजवाडा अश्या अनेक वास्तू आणि बांधकाम कामं या कंपनीने पुर्ण केली आहेत.

आता हे सर्व झालं महात्मा फुलेंच्या कंपनीविषयी.पण तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट माहित असणे गरजेची आहे,ती म्हणजे महात्मा फुले यांनी या कंपनीतून उभा राहिलेला आपल्या वाट्याचा आर्थिक हिस्सा त्यांनी समाजकार्यासाठी दिला आहे.येवढचं नाही तर महात्मा फुलेंनी कंपनीच्या कामासोबत उर्वरीत संपुर्ण वेळ समाजकार्याला दिला.यातून त्यांनी मोठी सामाजिक क्रांती घडवली आणि शिक्षण क्षेत्राला संजिवनी दिली.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page