प्लॅशबॅक! २०२२ वर्षात घडलेल्या या गोष्टी तुमच्या कायम स्मरणात राहतील..

- कोरोना परिस्थितीतून बाहेर पडत प्रत्येक जण या वर्षात स्वत:ला सावरत होता.अनेकांसमोर आर्थिक संकटं आ वासून उभी होती.या संकटातून बाहेर पडत अनेकांनी नव्या आयुष्याची सुरूवात केली.राज्यातील अनेक घडामोडी आपल्या समोरून जातात.त्या घडामोडी हे वर्ष कसं होतं याचा फ्लॅशबॅक देवून जातात.चला तर या फ्लॅशबॅकची उजळणी करूयात..
२०२२ हे वर्ष प्रत्येकासाठी आव्हानात्मक होतं.कारण,कोरोना परिस्थितीतून बाहेर पडत प्रत्येक जण या वर्षात स्वत:ला सावरत होता.अनेकांसमोर आर्थिक संकटं आ वासून उभी होती.या संकटातून बाहेर पडत अनेकांनी नव्या आयुष्याची सुरूवात केली.दरम्यान या वर्षाकडे मागे वळून पाहत असताना देशातील,राज्यातील अनेक घडामोडी आपल्या समोरून जातात.त्या घडामोडी हे वर्ष कसं होतं याचा फ्लॅशबॅक देवून जातात.चला तर या फ्लॅशबॅकची उजळणी करूयात..
अनाथांची माय महाराष्ट्राने गमावली
२०२२ या वर्षाची सुरूवात खुप आशादायी पद्धतीने झाली.कारण कोरोनाला बाजूला सारून सर्वांनी नव्या दमाने कामाला सुरूवात केली होती.मात्र याच महिन्यात ४ जानेवारीला महाराष्ट्राने अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांना गमावलं.सिंधुताईंच्या जाण्यानं संपुर्ण महाराष्ट्र हळहळला होता.
लता दिदींनी जगाचा निरोप घेतला
यानंतर फेब्रुवारी महिन्यात दुसरा धक्का महाराष्ट्राला बसला.६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला.मुंबईतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात लता दिदींचं निधन झालं. यादिवशी महाराष्ट्राने जागतिक दर्जाची गान कोकिळा गमावली.
एमपीएसच्या विद्यार्थ्याचं लक्षवेधी आंदोलन
कोरोना परिस्थितीनंतर एमपीएसच्या परिक्षा पुढे ढकलल्यामुळे संतप्त झालेल्या एमपीएसच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलनं केली.यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनीही ऑनलाईन परिक्षेसाठी आंदोलनं केली.यामुळे काही काळ राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
सत्तांतर
जुन २०२२ मध्ये महाराष्ट्राने मोठं सत्तांतर अनुभवलं.शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपशी घरोबा करत नवीन सरकार स्थापन केलं. राज्यात शिंदे-फडणवीस हे नवीन सरकार अस्तित्त्वात आलं. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या सत्तांतरानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले व यानंतर राज्यात आरोप-प्रतिआरोपाचे धडे ऐकले.
संजय राऊत अटक-सुटका
शिवसेना खासदार संजय राऊत यांना जुलैमध्ये पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली.यानंतर त्यांना जवळपास १०० दिवस जेलमध्ये राहावं लागलं.त्यानंतर हि अटक बेकायदेशीर आहे असं म्हणत न्यायालयाने त्यांचा सुटका केली.
अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
यावर्षी राज्यात पावसानं कहरच केला होता. सुरुवातील जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, नंतरच्या काळात म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी राज्यात धुमाकूळ घातला होता. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांची उभी पीक वाया गेल्यानं शेतकरी संकटात सापडला होता. सोयाबीन, कापूस, तूर, फळबागांना मोठा फटका बसला होता. तसेच यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसला. अतिवृष्टीतून वाचलेली उरली सुरली पीक या परतीच्या पावसानं वाया गेली.
या पावसाचा मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फटका बसला होता.
लम्पी आजारांचं सावट
२०२२ मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये देशातील काही राज्यात लम्पी स्कीन आजारानं थैमान घातलं.यामुळं अद्यापही पशुपालक चिंतेत आहेत. या आजारामुळं अनेक राज्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांचा मृत्यू झाल्याचं देखील २०२२ मध्ये पाहायला मिळालं. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. महाराष्ट्रातही जवळपास ३० जिल्ह्यांमधील जनावरांना लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि दिल्ली या राज्यात पशुधनामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला.
तर असा हा या वर्षाचा फ्लॅशबॅक!येणारं नवं वर्ष हे महाराष्ट्राला समृद्ध करणारं असो हिच सदिच्छा!