वीम कंपनीने पुरूषांसाठी भांडी घासायचं लिक्विड आणलं खरं,पण कंपनीचा सगळा कार्यक्रमचं गंडला..

तुम्ही आजवर बाजारामध्ये अनेक भांड्यांचे साबण किंवा डिश वॉश लिक्विड पहिले असतील. हे डिश वॉश लिक्विड फक्त भांडी स्वच्छ करण्याचं काम करतात. पण वीम कंपनीने कहर करत नवीन डिश वॉश लिक्विड बाजारात आणलाय. आता तुम्ही म्हणाल यात नवं काय? तर ऐका.. वीम कंपनीने बाजारात नव्याने आणलेलं डिश वॉश लिक्विड हे फक्त पुरूषांसाठीच आहे. बसला ना शॉक?
आजपर्यंत स्त्री आणि पुरूषांसाठी वेगवेगळी सौदर्य साधनं असतात हे आपण सर्वांनी पाहिलं होतं.पण भांडी घासण्याचं लिक्विड येणं हे थोडं न पटणारं आहे.असो,नेहमीच आई आणि ताईने का काम करावं? पुरूष म्हणून आपणही ते करून पाहावं,असं म्हणत बहुधा वीमने हे प्रोडक्ट बाजारात आणलं असावं.पण आता हे प्रोडक्ट नेटकऱ्यांच्या टिकेचं धनी बनलंय.

बरं,हे सर्व बाजूला ठेवू,आपण यामागची वीम कंपनीची संकल्पना शोधण्याचा प्रयत्न करू.वीमने पहिल्यांदा आपला वीम बार बाजारात आणला.याला ‘शंभर लिबांची शक्ती असलेला वीम बार’ अशी टॅग लाईन जोडली आणि आपली मार्केटिंग सुरू केली. दरम्यान हि मार्केटिंग चांगलीच काम करू लागली आणि वीम बारचा खप वाढू लागला. यानंतर बीमने लिक्विड सोप लॅन्ज केलं.यालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.मात्र,आता वीम बाजारात उतरवण्यासाठी इच्छुक असलेल्या ‘वीम फॉर मेन्स’या लिक्विड सोपला नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिसाद मिळताना दिसतोय.याचमुळे हा विनोद होता,असं स्पष्टीकरण देऊन वीमने हे प्रोडक्ट बाजारात येणार नसल्याचं म्हटलंय.
दरम्यान, वीमला हे प्रोडक्ट स्त्री-पुरूष समानतेला जाहीरपणे समर्थन देणारं ठरू शकतं, असं वाटत होतं.पण,नेटकऱ्यांच्या टिकेमुळे या प्रोडक्टची मार्केटींग फेल गेली.दुसरीकडे बॉलीवूड अभिनेता मिलिंद सोमणने या प्रोडक्टची जाहिरात केल्याने ही जाहिरात वादग्रस्त ठरली आणि यामुळेच हि जाहिरात लिंगभेदी असल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून होऊ लागला.मात्र,या मार्केटिंगमुळे बाजारात हे प्रोडक्ट चालू शकतं का? याचा अंदाज वीमला आला.