अफजलखानाने त्याच्या ६३ बायकांची थरारक पद्धतीने हत्या का केली होती?

थोडक्यात
  • ही घटना आहे तो स्वराज्यावर चालून येतानाची. अफजल खानाच्या दहशतीने अनेक बादशाहया या दडपून होत्या. अफजल खान चालून येणार म्हटल्यावर अनेक योद्धे आपली शस्त्रं टाकत. मात्र, अश्यात शिवरायांनी अफजल खानाचा सामना शक्तीने नाही तर युक्तीने करण्याची योजना आखली होती. अफजल खानाने आपल्याला मारण्यासाठी आदिलशाही दरबारात विडा उचलला आहे,याची महाराजांना पुर्वकल्पना होती.म्हणूनच महाराजांनी अफजल खानाशी सामना करण्याची तयारी नियोजित पद्धतीने केली होती.

आज तिथीनुसार शिवप्रताप दिन.आजच्याच दिवशी महाराष्ट्रावर चालून आलेल्या अफलजखान नावाच्या संकटाला छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राचं अस्मान दाखवत प्रतापगडाच्या मातीत कोथळा काढून गाढलं होतं.अदिलशाही दरबारातील नावाजलेला सरदार म्हणून ख्याती असलेला अफजलखान शिवरायांसमोर साधा टिकूही शकला नाही.

आपल्या पराक्रमाने गर्विष्ठ झालेला अफजलखान महाराष्ट्रावर ज्या रोषानं चालून आला होता, त्या रोषाचा छत्रपती शिवरायांनी समूळ नाश केला. हा अफजल खान इतका क्रूर होता, कि त्याच्या नावाने त्याचं सैन्यसुद्धा दहशद खात होतं. येवढचं नाही तर त्याच्याशी मैत्री करायचं थाडसंही कुणी करत नव्हतं. अफजल खानाच्या क्रूरतेच्या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना होत्या .त्यातलीच एक घटना म्हणजे अफजल खानानं त्याच्या ६३ बायकांची केलेली क्रूर हत्या. याच हत्येची कहाणी आपण आजच्या लेखातून पाहणार आहोत.

ही घटना आहे तो स्वराज्यावर चालून येतानाची. अफजल खानाच्या दहशतीने अनेक बादशाहया या दडपून होत्या. अफजल खान चालून येणार म्हटल्यावर अनेक योद्धे आपली शस्त्रं टाकत. मात्र, अश्यात शिवरायांनी अफजल खानाचा सामना शक्तीने नाही तर युक्तीने करण्याची योजना आखली होती. अफजल खानाने आपल्याला मारण्यासाठी आदिलशाही दरबारात विडा उचलला आहे,याची महाराजांना पुर्वकल्पना होती.म्हणूनच महाराजांनी अफजल खानाशी सामना करण्याची तयारी नियोजित पद्धतीने केली होती.

अफजल खान बलाढ्य फौजेनिशी महाराष्ट्रावर चालून येणार होता.अफजल खानाने मोहीमेची तयारी पुर्ण केली आणि तो महाराष्ट्राच्या दिशेने निघाला.याचदरम्यान विजापूरातून येण्यापूर्वी त्याच्यासोबत काही विचित्र प्रकार घडत होते. मोहीमेच्या सुरूवातीला त्याला पहिला धक्का बसला तो म्हणजे फौजेतला निशाण्याचा हत्ती फत्तेलष्करचा मृत्यू झाला. याचवेळी सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने निशाण्याचे ध्वजही तुटले.अफजलखानाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.त्याला हे सर्व अपशकून वाटतं होते.

हे सर्व पाहून अफजलखानाने आपल्या मुळ तोरवे गावातील आपल्या गुरूकडे धाव घेतली आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. यावर अफजलखानाच्या गुरूने ही मोहीम न करण्याचा सल्ला अफजलखानाला दिला. यामुळे अफजलखान आतून खचला. मात्र, त्याने माघार न घेण्याचा निर्णय घेऊन मोहीम सुरूच ठेवण्याचा निश्चय केला. दरम्यान मनात त्याला त्याच्या मृत्यूची चिंता सतावत होती. याचसोबत आपण गेल्यावर आपल्या बायकांवर परपुरूषाची नजर पडू नये,त्या दुसऱ्यांच्या नादाला लागू नयेत म्हणून त्याने एक योजना आखली.

त्याने आपल्या तोरवे गावातील एका भव्य वाड्यात आपल्या ६३ बायकांसह स्वत:ला कोंडून घेतले.त्यांच्यासोबत त्याने आठ दिवस मौज केली आणि यानंतर नवव्या दिवशी एकएकीला शेजारील विहीरमध्ये ढकलून त्यांची हत्या केली.यातून आपला जीव वाचवून पळून जाणाऱ्या बायकोलाही पकडून त्याने ठार मारले.यानंतर त्याने सर्वांची कबर बांधून तिथेच जवळपास निर्जन ठिकाणी त्यांना दफन केले.

आजही ही जागा भारतीय पुरात्तव विभागाने जतन करून ठेवली आहे.कर्नाटक राज्यात विजापूरमधील हा भाग साठकबरीया या नावाने ओळखला जातोय.असा हा क्रूर अफजलखान स्वराज्यावर चालून आला आणि आजच्याच दिवशी छत्रपती शिवरायांनी त्याचा कोथळा काढून त्याला ठार केला.

संदर्भ
१.इतिहास अभ्यासक डॉ.सचिन पोवार
२.संदर्भ ऐतिहासिक कथा-डॉ. विजय कोलपे
३.अफजलखानाचा वध- विनायक लक्ष्मण भावे

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page