शिवशक्ती-भीमशक्ती प्रयोगामुळे ठाकरे गटाला नवसंजीवनी मिळेल का?

थोडक्यात
  • वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या युतीविषयी वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत होते. दरम्यान या भुमिकेत असताना त्यांनी या युतीसाठी सकारात्मक पाऊल पुढे टाकलं होतं.

प्रकाश आंबेडकरांसोबत उद्धव ठाकरे युती करणार का? हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून राजकिय पटलावर वारंवार चर्चिला जात होता. या प्रश्नाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून स्वत: उद्धव ठाकरेंनी उत्तर देत शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा केली आहे. मात्र,तुम्हाला माहितेय का? उद्धव ठाकरेंचा हा निर्णय शिवसेनेला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला नवसंजीवनी देणारा ठरू शकतो.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या युतीविषयी वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत होते. दरम्यान या भुमिकेत असताना त्यांनी या युतीसाठी सकारात्मक पाऊल पुढे टाकलं होतं. प्रबोधनकारांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला आम्ही मानतो,एकत्र आल्यास निश्चित उत्तम काम करू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, आता उद्धव ठाकरेंनी या युतीला हिरवा कंदिल दाखवत युतीची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे सत्तातरानंतर एकाकी पडलेल्या ठाकरे गटाला प्रकाश आंबेडकर यांच्या रुपाने दलित समाजातील मोठ्या गटाचा पाठींबा मिळू शकतो,असा अंदाज राजकिय विश्लेषक व्यक्त करतायेत.

विदर्भ-मराठवाड्यातील मतदारांचा कौल

शहरी भागात उदयाला आलेल्या शिवसेनेला आजही ग्रामीण भागात हवा तेवढा पाठींबा मिळवता आलेला नाहीये.त्यातल्या-त्यात मराठवाडा आणि विदर्भात शिवसेनेची ताकद काहीशी तोकडी पडताना दिसत आहे.अश्यात मराठवाडा आणि विदर्भात वंचितच्या जोरावर जास्तीत जास्ती उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेने जर प्रयत्न केला तर निश्चित याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो.त्यातूनही विदर्भ-मराठवाड्यातील मतदारांचा कौल शिवसेनेकडे झुकू शकतो.

सुषमा अंधारे-प्रकाश आंबेडकर दलित मतदारांसाठी ठरू शकतात खास

शिवसेनेला दलित मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेने आशादायी काम केलं.हेच काम प्रकाश आंबेडकरांच्या मदतीनेही प्रभावीपणे उत्तमरित्या केलं जाऊ शकतं.यामुळे मोठा दलित समाजाचा पाठींबा भविष्यात शिवसेनेकडे येऊ शकतो.

भाजपसाठी शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग मारक ठरेल का?

हिंदू मतधिक्यांच्या जोरावर तसंच स्थानिक पातळीवर होत असलेल्या कामांच्या बळावर भाजप आपल्या मतांची गोळा-बेरीज ठरवते. त्यामुळे पुढील काही वर्ष भाजपसाठी शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग मारक ठरेल अशी शक्यता राजकिय विश्लेषकांना कमीच वाटत असली तरी या युतीमुळे भाजपच्या अंदाजे मतदानाच्या गोळा-बेरीजेला सुरूंग लागू शकतो. या युतीमुळे मतविभाजनाचा तोटा भाजपला सहन करावा लागू शकतो. कारण,मागील विधानसभा निवडणूकीचा विचार केला तर वंचितकडे महाराष्ट्रातील १४ लाख मतदारांचा कौल होता.

महाविकास आघाडीत वंचितला सामिल केले जाईल का?

प्रकाश आंबेडकर आणि चळवळीचा पुर्वीचा इतिहास पाहता कॉंग्रेस,एनसीपीसोबत त्याचं पक्कं वैर होतं.मात्र हे वैर चर्चेतून दूर झालं आणि वंचितला आघाडीत महत्त्वाचं स्थान मिळालं तर याचे थेट परिणाम पुढील विधानसभा निवडणूकीत पाहायला मिळू शकतात. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांवरून आणि प्रकाश आंबेडकरांच्या स्वरावरून येत्या काळात त्यांना महाविकास आघाडीत स्थान मिळू शकतं असा अंदाज आहे.

या सर्व स्थितीचा विचार करता शिवसेनेला पाठींब्याच्या जोरावर मतधिक्यांसाठी वंचित नवसंजीवनी देऊ शकेल असा अंदाज आहे.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page