कोंबडीची कत्तल न करता ही तुम्ही खाऊ शकता मास.. कसं? वाचा सविस्तर..

चिकन खाणं किंवा मासांहार करणं हे अनेकांच्या दृष्टीकोनातून पाप मानलं जातं. अनेकदा याला पशू हिसेंचं नावही दिलं जातं. मात्र,दुसरीकडे खवय्यांकडून हेच चिकन दाबून खाल्लं जातं. पण आज मी तुम्हाला कोणत्याही कोंबडीची हत्या न करता, तुम्ही चिकन खाऊ शकता असं सांगितलं तर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र,हो! हे खरं आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मास तयार करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळवलंय.

अपसाईड फूडस् या अमेरिकन कंपनीने कोंबड्यांच्या पेशींवर प्रक्रिया करून त्यापासून मास निर्मिती करणारा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. येवढचं नाही तर या मासाची चवही हूबेहूब चिकनसारखीच लागत असल्याचं सिद्ध देखील झालं आहे. या प्रयोगाच्या यशानंतर अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनानं हे मासं खाण्यासाठी सुरक्षित असल्याचं देखील म्हटलं आहे.

या मास निर्मितीच्या प्रक्रियेला जवळपास १८ तास ते ४८ तासांचा अवधी लागतो.हे मास प्राथमिक तत्त्वावर प्रयोगशाळेमध्ये उभारण्यात आलेल्या प्लान्टमध्ये तयार केले जात आहे.जिवंत कोंबडी वाढवणे व त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनंतर तीची कत्तल करणे यासाठी लागणाऱ्या कालावधीपेक्षाही कमी कालावधीमध्ये अपसाईड फूडस् चे हे मास तयार होत असल्याने याची मागणी भविष्यात अधिक असण्याची शक्यता आहे.

दरम्यान हे मास बाजारात येण्यासाठी आंतरराष्ट्रीय परवानग्या आणि इतर परवाने आवश्यक असल्याने यासाठी २०२८ चे साल उजाडू शकते असं मत या कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page